अमळनेर ::> बाजार समितीमधील बेकायदेशीर कटती बंद करण्याच्या ठरावाची प्रत मिळावी, कटतीची रक्कम परत मिळावी यासाठी गावरानी जागल्या संघटनेने प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
अमळनेर बाजार समितीने बेकायदेशीरपणे क्विंटल मागे एक किलो कटती केली. ही रक्कम सभापती आणि संचालक मंडळाने परत केली नाही. तसेच बेकायदेशीरपणे कटती बंद करण्याचा ठराव ज्या प्रोसिडिंग बुकमध्ये लिहिला आहे, त्याची प्रत मिळावी यासाठी दिनकर पाटील, प्रा.चंद्रकांत जगदाळे यांनी आंदोलन सुरू केले आहे. गावराणी जागल्या संघटनेचे प्रा.विश्वास पाटील, हिरालाल पाटील, अरुण देशमुख, विलास पाटील आदी देखील त्यात सहभागी झाले आहेत.