प्रतिनिधी अमळनेर ::> मारवड रस्त्यावर असलेल्या क्रीडा संकुलला झाडे झुडपांचा वेढा पडल्याने युवक, युवती आणि क्रीडा प्रेमींना तेथे प्रवेशही अवघड झाला होता, आमदार अनिल पाटील त्या ठिकाणी पाहणी करायला गेले असता खेळाडूंनी त्यांना साकडे घातले आणि समस्यांचा पाढा वाचताच आमदारांनी पाच-सहा जेसीबी मशिन मागवून काही तासात क्रीडा संकुल स्वच्छ करून त्याला उपयुक्त केले.
अमळनेर तालुक्याच्या क्रीडा संकुलला तरोठे, बाभूळ तसेच गवत वाढून वेढा पडला होता 6 ते 7 फूट उंचीचे झुडपे वाढल्याने ट्रॅक वरील माणूस सुद्धा दिसत नव्हता त्याचे दुष्परिणाम असे झाले भुरट्या चोरांनी तार कंपाऊंड आणि लोखंडी अँगल चोरून नेले तर काही गैरप्रकार देखील घडले, महिला खेळाडूंकरिता असुरक्षितता निर्माण झाली होती,आमदार अनिल पाटील क्रीडा संकुलाची पाहणी करायला गेले असता त्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी सराव करणारे तरुण, खेळाडू यांनी आमदारांना साकडे घातले ट्रॅक खराब झाला आहे, मैदान व परिसरात झुडपे, काटे वाढले आहेत, पायी फिरणाऱ्यांनाही त्रास होत आहे, तसेच लांब उडी, उंच उडी मैदानावर योग्य माती नाही, संकुलाच्या मैदानात प्रवेश करायला देखील अडथळे आहेत, डबल बार, सिंगल बार तुटलेले आहेत, लाईटची व्यवस्था नाही आदी समस्या मांडल्या.
प्रत्येक्ष परिस्थिती पाहून आमदारांना देखील अडचणीची जाणीव झाली त्यांनी ताबडतोब तहसीलदार मिलिंद वाघ व क्रीडा समितीच्या शिक्षकांशी संपर्क साधून तातडीने वॉशआऊट मोहीम राबवली, स्वतःच्या जेसीबी सह इतर पाच ते सहा जेसीबी मशीनच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम सुरू केली अवघ्या काही तासात झुडुपे काढून टाकण्यात आली, मुरूम मागवून क्रीडा संकुलातील प्रवेश रस्ता दुरुस्त केला, उडी मारण्याच्या मैदानावर घेसुची माती तर ट्रॅकवर लाल-पिवळी माती टाकुन अजून काही पथदिवे👍 लावून उजेडाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार अनिल पाटील यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ, क्रीडा संघटनेचे सचिव डी डी राजपूत, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, यांच्या सह क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
गजानन पाटील अमळनेर✍