अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप…

Social कट्टा अमळनेर कट्टा

प्रभाग क्रं. १४ मध्ये नगरसेविका व मुख्याधिकारी यांच्या हस्ते अर्सेनिक अल्बम -30 गोळ्याचे वाटप….

अमळनेर :- शहरात कोरोना जीवघेण्या आजाराने पुन्हा डोके वर काढले असून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अश्या परिस्थितीतही आपल्या जीवाची पर्वा न करता अमळनेर नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी, व्हाल मन, दिवाबत्ती विभाग, घंटा गाडीचे ड्रायव्हर तसेच महावितरणचे वायरमन हे नागरिकांना दिवसरात्र राबून नागरिकांना सेवा देत आहेत.
तसेच आपले काम 24 तास मेहनत व ईमानदारीने करीत असतांना त्यांचे आरोग्य अबाधित रहावे याकरिता अर्सेनिक अल्बम -30 (होमिओपॅथी) गोळ्याचे वाटप करण्यात आले. नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील व अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. सोबत रवि पाटील, संजय चौधरी प्रशासन अधिकारी, संतोष बि-हाडे आरोग्य निरीक्षक, संजय पाटील अभियंता बा.विभाग, प्रशांत ठाकूर अभियंता दिवाबत्ती विभाग, विकास बिरारी नगर रचनाकार, गोपाल गजरे मूकरदम, महावितरण चे हर्षल निकुंभ, राहुल सोनवणे, व्हाल मन प्रितेष सोनार, जगदीश सोनार, विजय महाजन, किरण अहिरे, सागर विसपुते, अक्षय चव्हाण इ.कर्मचारी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक १४ मध्ये कोरोना संसर्गाचा काळात नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील हे नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *