संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी निवड

Politicalकट्टा कट्टा

जयश्री पाटील यांचा सत्कार.

अमळनेर प्रतिनिधी >>येथील कळमसरे जळोद गटाच्या जिल्हापरिषद सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांची अमळनेर तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा सकल धनगर समाज व राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी आ अनिल भाईदास पाटील, नागरी हित दक्षता समितीचे अध्यक्ष प्रा अशोक पवार, होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत, उपाध्यक्ष नितीन निळे, सचिव एस सी तेले, प्रभाकर लांडगे, प्रदीप कंखरे, आनंदा धनगर, प्रा जी एल पाटील, दिनेश भलकार, रमेश धनगर, रवींद्र धनगर, प्रा आर पी धनगर, प्रा मनोज रत्नपारखे, प्रा सी बी सूर्यवंशी, जयप्रकाश लांडगे, प्रताप मोरे आदी उपस्थित होते.

गजानन पाटील अमळनेर✍