अमळनेर >> ६ जून रोजी रात्री १२ वाजता ३१ अहवाल प्राप्त झाले असून ८ जण पॉझिटिव्ह आले आहेत तर २३ जण निगेटिव्ह आले आहेत. सराफ बाजार ५५ वर्षीय महिला व ६० वर्षीय पुरुष, गांधलीपुरा ३७ वर्षीय महिला, सुभाष चौक ५५ वर्षीय महिला, मराठे गल्ली ३७ वर्षीय पुरुष, शहापूर ५४ वर्षीय पुरुष, बाहेरपुरा ३२ वर्षीय पुरुष, फरशी रोड ३६ वर्षीय पुरुष आदीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच पारोळा तालुक्यातील सुमठाणे येथील ५५ वर्षीय पुरुषाचा एक अहवाल अमळनेर येथून पाठवला होता तो देखील पॉझिटिव्ह आला आहे. २३ निगेटिव्ह आले असून 47 अहवाल प्रतीक्षेत आहेत.