पाच हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच ; आठ महसूल मंडळात विम्याच्या लाभ

Social कट्टा कट्टा

प्रतिनिधी अमळनेर >> अमळनेर तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला असून गुरुवारी जिल्हा बँक व इतर बँकांना पिक विम्याची यादी प्राप्त झाली आहे. रक्कम बँकांच्या खात्यावर टप्पाटप्याने जमा होणार असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली.


असून यात भुईमग मका सोयाबीन ज्वारी या पिकांना पीक विम्याचा लाभ मिळाला असून लवकरच ह्या निधीची रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या सर्व बँकांच्या खात्यावर जमा होणार आहे सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी करू नये, खात्यावर पैसे झाल्याशिवाय बँकेत जाऊ नये.

सर्व रक्कम लवकरच जिल्हा बँकेच्या खात्यात जमा होणार असून त्याची शेतकऱ्यांनी वाट पहावी, कोरोनात पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये सुरक्षा असावी हे पाहता अनुदान प्राप्त झाला असता टप्प्याटप्प्याने सर्व बँका शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असून त्याचा लाभ लाभार्थी शेतकऱ्यांना मिळेल प्रत्येक गाव निहाय पीक विम्याची यादी प्रकाशित होतील.

तालुक्यातील 8 महसूल मंडळात पीक विम्याचा लाभ मिळाला असून आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे याबाबत तालुक्यात अतिवृष्टी आणि पाऊस झाला असताना गावे लाभापासून वंचित होती.

काही गावांना यापूर्वी पावसाळी अवकाळी अनुदान शेतकर्यांना मिळाले असून आता पीक विमाचे कवच 5 हजार शेतकरयांना एकूण तालुक्यात 28 हजार शेतकरी असून त्यात कापूस पीक विमा अद्याप मंजूर झालेला नाही त्याबाबत सरकार लवकरात लवकर निर्णय घेणार आहे. त्याचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.
गजानन पाटील अमळनेर✍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *