धनगर समाजाच्या वतीने साध्या पद्धतीने अहिल्याबाई होळकर जयंती साजरा

अमळनेर

रजनीकांत पाटील >> आज अमळनेर तालुका धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 295 जयंती साजरी करण्यात आली. सध्या कोरोनाच्या परिस्थितीत अमळनेर शहरात जनता कर्फ्यू लागू असल्याने गावातील समाजबांधवांना या ठिकाणी उपस्थित राहता आले नाही. तरी अमळनेर तालुका धनगर समाज यांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ जाऊन समाजातील काही प्रतिनिधींनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती साजरी केली. पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम असलेली लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे महान कार्य आहे. सामाजिक अंतर ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डी ए धनगर, समाजाचे अध्यक्ष मच्छिंद्र लांडगे, सानेगुरुजी पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन दशरथ लांडगे, चंदूसिंग परदेशी व सतीश धनगर यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *