बाम्हणे ता.अमळनेर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कृ.उ.बा समितीचे संचालक तथा बाम्हणे वि.का.सो चे चेअरमन पराग पाटील यांच्या वतीने अर्सेनिक अल्बम 30 हया गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
कोरोना व इतर रोगांपासुन बचाव करण्यासाठी व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ह्या गोळ्या उपयुक्त असतात.
यावेळी सरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच प्रकाश पाटील, ग्रामसेवक अभिजित देवरे,आशा सेविका शारदा पाटील, जेष्ठ नागरिक धनराज गंभीर पाटील , युवराज गंभीर पाटिल, रमेश विनायक पाटिल, हिरा आबा, जिजाबराव पाटिल सामाजिक कार्यकर्ते भिकन पाटील ,संतोष पाटील ,जगदीश भगवान पाटील, वसंत पाटील,बापूराव पाटिल, दुर्योधन नेरकर ,रमेश पाटील शेखर पाटील यांच्या उपस्थितीत सोशल डीस्टंसिंग चे नियम पाळून नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करुन जनजागृती करण्यात आली.
> गजानन पाटील अमळनेर✍