शैक्षणिक दाखल्यासाठी प्रकरणात त्रुटी काढून विद्यार्थ्यांना दिला जातोय त्रास…

अमळनेर सिटी न्यूज

सामाजिक कार्यकर्त्या जयश्री साळुंके व प्रवीण पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत दिला उपोषणाचा इशारा

रजनीकांत पाटील अमळनेर ::> विविध शैक्षणिक दाखल्यासाठी प्रकरणात त्रुटी काढून विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असून त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या जयश्री साळुंके व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रविन पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.


सदर निवेदनात नमूद केले आहे की, सध्या कोव्हीड-१९ च्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे आर्थिक, शैक्षणिक नुकसान होत आहे. आता विद्यार्थी वेगवेगळया प्रकारचे दाखले काढण्यासाठी उपविभागीय कार्यालयाकडे प्रकरणे सादर करतात. या सर्व दाखल्यांच्या पुर्तता करण्याऐवजी त्यात अनावश्यक त्रुटी काढल्या जात आहेत.

त्रुटीपण अशा काढल्या जातात की ज्यांचा कोणत्याही शासकीय नियमात उल्लेख नाही किंवा ज्या त्रुटींची पुर्तता झालेली आहे हे न तपासता किंवा पडताळणी करुन न घेता प्रकरण त्रुटीत काढले जाते.

महसुल विभागातर्फे विनाकारण आपत्ती व्यवस्थापन काळात विद्यार्थ्यांना जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने त्रुटीत काढत आहेत. त्यामुळे सदर तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा दि. ११ सप्टेंबर उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण केले जाईल, असा इशारा ही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *