ABVP विध्यार्थी मारहाण प्रकरणी अमळनेर येथे निषेध..

Politicalकट्टा अमळनेर

अमळनेर प्रतिनिधी >> धुळे येथे विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक विद्यार्थ्यांना ज्या अमानुषपणे पालकमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या समोर मारहाण करण्यात आली. लोकशाहीमध्ये संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याची मुभा असताना हे महाराष्ट्रातील सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना अमानुष मारहाण करत आहे.

महाराष्ट्रातील सरकार हे नक्की कोणाचे मुघोलांचे की ब्रिटिशांचे अशी म्हणायचे वेळ आता आलेली आहे. विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानूष मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाप्रदेशाध्यक्ष विक्रांतदादा पाटील व आमदार स्मिताताई उदय वाघ यांच्या सूचनेप्रमाणे आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी मा.तहसीलदार ह्यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शिवाजी राजपूत शहर अध्यक्ष योगीराज चव्हाण समाधान पाटील कल्पेश पाटील हिरालाल पाटील सौरव पाटील कुंदन पाटील युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गजानन पाटील अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *