कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार येथील पिरबाबांचे उर्स रद्द

अमळनेर


खान्देशातील सुप्रसिद्ध हिन्दु मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेले अमळनेर शहर पासून पाच किलोमीटर अंतरावरील धार गावातील हजरत अब्दुल रज्जाक शाह पिरबाबांचे उर्स यात्रा दर वर्षी मोहरम महिन्यातील ऊर्दू चार पाच तारखेला उर्स व संदल मिरवणूकीचा आयोजन करण्यात येत असते.

परंतु या वर्षी कोरोना व्हायरस महामारी मुळे संपूर्ण देशा सह राज्यभरात लाँकडाऊन सुरू असल्याने धार्मिक स्थळे तसेच गर्दीच्या ठिकाणावर बंदी चे आदेश असल्याने येथील स्थानिक प्रशासनाच्या सुचनेने पिरबाबांचे मुजावर कमिटीने तातडीची बैठक घेऊन निर्णय घेतले की या वर्षी दिनांक २४ व २५ अगस्त रोजी होणाऱ्या उर्स यात्रा रद्द करण्यात आली आहे.

उर्स यात्रेला येणाऱ्या भाविकांनी उर्स यात्रेत येऊ नाही दर्शनासाठी दर्गा बंद राहणार आहे सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन धार पिरबाबांचे मुजावर कमिटीने केले आहे.


गजानन पाटील अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *