रोगाची व्यापकता लक्षात घेता तहसीलदार वाघांनी दाखविली समय सुचकता

अमळनेर सिटी न्यूज

शहर प्रतिनिधी अमळनेर >> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन आजारांना आमंत्रण देणे टाळले पाहिजे असे मत असलेल्या तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी वेळीच दखल घेत अनेक नागरिकांना नवीन रोगा पासून वाचविण्याचे काम केले आहे.

तहसील कार्यालयात रोज ये-जा करत असतांनाच तहसीलदार वाघ यांच्या निदर्शनास आपत्ती व्यवस्थापनासाठी मागील वर्षी शासनाने पाठविलेल्या बोटी कडे लक्ष गेले. या बोटीत जवळपास हजार लिटर पावसाचे पाणी साचले होते.त्यातच कोणी घरातील गोधड्या,टमाटे,अंड्याचे फोतरे यासह अनेक गोष्टींचा समावेश आढळून होता.

जमलेल्या पावसाच्या पाण्यात मच्छरानी मोठ्या प्रमाणात अंडी घातलेलेही आढळून आले.यामुळे भविष्यात यातून डेंगू, मलेरिया सारखे साथीच्या आजारांना आमंत्रण दिले जाऊ शकते.शिवाय तहसील कार्यालयासह उपविभागीय कार्यालय, रजिस्ट्रार कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या बघता यांच्यात यामुळे आजार पसरू नये म्हणून कोरोना सह सावधगिरी बाळगत या बोटीतील घाणेरडे झालेले पाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने उपसून बोटीत पावसाचे पाणी परत जमा होऊ नये म्हणून बोटीला उलटी करून ठेवण्यात आल्याने तहसील कार्यालयातील येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांसह कर्मचारी, स्टॅम्प वेंडर व इतर अधिकाऱ्यांनाही या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये. याची काळजी घेत फवारणीची करण्यात आली.वेळीच दखल घेत कोरोना आजाराला लक्षात घेता तहसीलदार वाघ यांनी दाखविलेल्या समय सुचकते बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बोट ला उलटी केलेला फोटो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *