अमळनेर बस स्थानकावरून महिलेचे मंगळसूत्र लंपास

अमळनेर क्राईम

अमळनेर >> अमळनेर बस स्थानकावरून महिलेचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना सोमवाारी दुपारी घडली. ७ तारखेला मोठ्या प्रमाणात लग्नतिथी होती, तर सोमवारचा बाजार असल्याने बस स्थानकावर गर्दी होती.

या गर्दीचा फायदा घेत दुपारी ३.२० वाजता धुळे यावल बसने फैजपूर जाणाऱ्या सुनीता माधव भोई यांचे पाच ग्रॅम वजनाचे २५ हजारांचे मंगळसूत्र १४ ते १५ वर्षाच्या मुलीने धक्का मारून लंपास केल्याची घटना घडली.

विशेष म्हणजे बस स्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित मुलगी आढळली आहे. तिच्यासोबत दोन अन्य मुलीही आहेत. या मुलीने इतर २ ते ३ जणांच्या सोनसाखळी ही लंपास केल्या आहेत.

दरम्यान, सुनीता भोई यांचे बंधू डॉ. उमेश सोनवणे हे बसस्थानकावरील पोलिस चौकीत गेले असता तेथे कुणीही आढळले नाही.