अमळनेर : आटाळेच्या दोन्ही मुलांची वृद्ध बापाला बेदम मारहाण

अमळनेर क्राईम

अमळनेर प्रतिनिधी ::> खावटी मागण्याच्या कारणावरून दोन्ही मुलांनी आपल्या बापाला काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना १२ ऑक्टोबरला सकाळी ढेकू चारम शिवारात घडली.

आटाळे येथील श्रावण त्र्यंबक पाटील या (वय ६६) या वृद्धाची ढेकू चारम शिवारात शेती अाहे. १२ ऑक्टोबरला सकाळी ते मजुरांसोबत शेतातील कापूस वेचण्यासाठी आले. यावेळी त्यांची मुले किशोर श्रावण पाटील, सतीश श्रावण पाटील हे दोघे देखील तेथे आले. त्यांनी आपल्या वडिलांना ‘तुला खावटी पाहिजे का? केसेस करतो का? असा जाब विचारला. यावेळी श्रावण पाटील यांनी शेती माझी आहे म्हणून मला खावटी पाहिजे, असे उत्तर दिले.

याचा राग आल्याने दोन्ही मुलांनी त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ठार मारण्याची धमकी देत नंतर काठीने मारहाण केली. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास प्रकाश साळुंखे करत आहेत.