रामेश्वर खुर्द जि प मराठी शाळेत आमदारांच्या हस्ते संरक्षण भिंतीचे भूमिपूजन

Social कट्टा अमळनेर कट्टा

भानुबेन शहा गोशाळेतर्फे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.
प्रतिनिधी अमळनेर ::> तालुक्यातील रामेश्वर खुर्द जि प मराठी शाळेत संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आ.अनिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले,याचवेळी अमळनेर येथील श्रीमती भानूबेन शहा गोशाळेतर्फे उपलब्ध झालेल्या शालेय गणवेशचे वाटप देखील आ.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


सदर कार्यक्रमात माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती, श्रीमती भानूबेन शहा गोशाळेतर्फे चेतन शहा, प्रा अशोक पवार, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत आदींनी शालेय गणवेश उपलब्ध करून दिल्याने मान्यवरांच्या हस्ते ते वाटप करण्यात आले, विद्यार्थ्यांना गणवेश सोबत वह्या देखील वाटप करण्यात आल्या.


यावेळीं आमदारांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सरपंच गंगाराम पाटील, सात्रीचे सरपंच महेंद्र बोरसे, विक्रांत पाटील, रामकृष्ण पाटील, पुना वंजारी, सुरेश वंजारी आदींची देखील विशेष उपस्थिती होती, कार्यक्रमास केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, शरद सोनवणे, मनोहर पाटील, योगेश पाटील, वैशाली पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते, सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले.*गजानन पाटील अमळनेर*✍