जिल्ह्यातील या शहरात आज बाजार बंद अन् जनता कफ्यू लागू

Social कट्टा अमळनेर कट्टा जळगाव जिल्हा

प्रतिनिधी गजानन पाटील अमळनेर >> शहरातील सोमवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आला असून ८ मार्चला शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.

जनता कर्फ्यूमुळे भाजीपाला बाजार बंद राहणार आहे. तर भाजी बाजार, भाजीपाल्याचा लिलाव, फळे यासह कापड, किराणा व इतर छोटे-मोठे व्यवसाय सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. हा कडकडीत बंद स्वयंस्फूर्तीने पाळण्यात येणार आहे.

सोमवारी जे व्यापारी बंद पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, व्यवसाय करतांना मास्क आणि फिजिकल डिस्टन्स पाळा तसेच एका दुकानात पाच पेक्षा जास्त ग्राहक नकोत, अशा ही सूचना देण्यात आल्या.

कोरोना आता घरापर्यंत पोहचला आहे, त्यासाठी जास्तीत जास्त काळजी घ्या, असे आवाहन प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे.

जीवनावश्यक वस्तू मिळणार : अमळनेर शहरात सोमवारी जनता कर्फ्यू पाळला जाणार असला तरी दूध, औषधी, रुग्णालय आणि शेतीविषयक साहित्य विक्रीची दुकाने आदी जीवनावश्यक वस्तुंची खरेदी विक्री करता येणार आहे.