अमळनेरात आठवडे बाजार बंदला १००% प्रतिसाद

Politicalकट्टा Social कट्टा अमळनेर कट्टा

प्रतिनिधी अमळनेर >> शहराचा सोमवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवून, भाजीपाला व्यावसायिक, व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला १०० टक्के प्रतिसाद दिला.

शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना खबरदारीचा उपाय म्हणून आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सोमवारी गजबजणारा भाजीबाजार बंद ठेवण्यात आला.

तसेच कापड विक्रेते, किराणा दुकानदार, भांडी व फळ विक्रेत्यांनीदेखील बंदमध्ये सहभाग नोंदवून आपापली दुकाने बंद ठेवली. तर जीवनावश्यक सेवेतील कृषी केंद्र, मेडिकल, दवाखाने यांची सेवा नेहमीप्रमाणे सुरू होती.

किराणा दुकानदार, भांडी व फळ विक्रेत्यांनीदेखील बंदमध्ये सहभाग नोंदवून आपापली दुकाने बंद ठेवली. तर जीवनावश्यक सेवेतील कृषी केंद्र, मेडिकल, दवाखाने यांची सेवा नेहमीप्रमाणे सुरू होती.