सुरत येथील डॉक्टराचे अनोखे दातृत्व ; कळमसरेकरांना केले औषधांचे वाटप

Social कट्टा कट्टा

कळमसरे गावातील अंगणवाडी सेविका व आशा सेविका कोरोनाच्या पाश्वभूमीवर करीत आहेत जनजागृती

अमळनेर प्रतिनिधी :> सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना या महामरीने जाळे पसरविले आहे. त्यामुळे या सांसर्गातून गरीब श्रीमंत असा कोणीही सुटू शकेल याची शास्वती नाही. याचेच गांभीर्य ओळखत कळमसरे गावातील सुपुत्र व सुरत येथील डॉ.राजेश महाले यांनी समाजाचे काहीतरी देणं लागत या संकल्पनेतून आपल्या गावकऱ्यांसाठी अनोख्या दातृत्वातून आरोग्याची काळजी घेतआयुवेर्दिक औषधांचा पुरवठा केला आहे.यामध्ये आठशे ते नऊशे कुटुंबाना या होमिओपॅथीक औषधांचे वाटप करण्यात येत आहे.


याचे वाटप गावातील अंगणवाडी सेविका व आशा स्वयसेविका यांच्या माध्यमातून केले जात आहे.
यासाठी अंगणवाडी सेविका सुशिलाबाई रमेश चौधरी,सरलाबाई पवार, वैशाली चौधरी, रेखाबाई जगदाळे,आशा सेविका वंदना सूर्यवंशी. अंगणवाडी मदतनीस भटाबाई गुलाब महाजन उषाबाई रामलाल पाटील, सुरेखा देविदास चौधरी हे परिश्रम घेत आहेत.डॉक्टर राजेश महाले यांनी महाभयंकर कोरोणा आजारावर रामबाण आयुवेर्दिक औषध उपलब्ध करून दिले आहे. ती काळाची गरज होती.त्यांच्या या दातृत्वाचे कळमसरे करांनी आभार व्यक्त करीत या समाजभिमुक कार्याचे कौतुक केले जाते आहे.

गजानन पाटील अमळनेर✍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *