अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे गॅस लीक झाल्याने सात घरांना लागली आग; पाच लाखांपेक्षा जास्त नुकसान

अमळनेर सिटी न्यूज

ग्रामस्थ व अग्निशमन दलाने वाचविले महिलेचे प्राण

अमळनेर प्रतिनिधी >> तालुक्यातील प्रगणे डांगरी येथील एका घरातील गॅस सिलिंडर लिक झाल्याने आग लागून रहिवास असलेली तीन घरे पूर्णत जळून खाक झाली आहेत. तर शेजारील चार घरे किरकोळ जळाली आहेत, यात सातही घरातील संसारोपयोगी वस्तू सह धान्याचे पोती व लाकडी छत जळून जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तलाठी यांनी व्यक्त केला. असून गावातील युवक व अग्निशमन दलाचे जवानांनी घरात लटकलेल्या महिलेचे प्राण वाचवले.

याबाबत सरपंच अनिल शिसोदे व पोलीस पाटील पंजाबराव वाडीले यांनी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना घटना कळविली असता घटनास्थळी तलाठी, मंडळ अधिकारी, गॅस कंपनीचे अधिकारी व पोलिसांनी भेट देऊन नुकसानी बाबत पंचनामा करण्यात आला आहे.


प्रगणे डांगरी येथील आनंद रामकृष्ण जाधव यांच्या घरातील भाडेकरू लक्ष्मीबाई चिंतामण पाटील यांनी दुपारी चहा करायला गॅस पेटवला असता सिलिंडर लिक असल्यामुळे अचानक पेट घेतला.

असता घरात आगीने धूर निघत असल्याने शेजारील युवकांनी पाहिले असता सुरुवातीला गॅस हंडी पेटताना दिसली त्यांनी आरडाओरडा केल्यावर लोक गोळा झाले. असता सरपंच अनिल शिसोदे यांनी अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केले.

आगीने हळूहळू शेजारील जगदीश रामकृष्ण जाधव , लिलाबाई रमेश न्हावी यांचे घर पूर्ण जळाले होते नरेंद्र शिसोदे,ज्ञानेश्वर पाटील,स्वप्नील कोळी,भूषण सूर्यवंशी, मयूर शिसोदे आदी युवकांनी धाब्याला लाकडी सरे असल्याने पटापट धाबे पाडण्यास सुरुवात केली.

तोवर अग्निशामक दलाचे कर्मचारी नितीन खैरनार, दिनेश बिऱ्हाडे, जफर पठाण, आनंदा झिम्बल यांनी आग विझवली, यात तिन्ही घरांना लागून असलेली भाऊराव दयाराम बडगुजर, लिलाबाई युवराज पाटील, परक्ष भिला पाटील, कमलबाई बन्सी बडगुजर यांची घरे देखील बऱ्याच अंशी जळाली आहेत.

या आगीत एक वृद्ध महिला घरात होती तिला युवकांनी व अग्निशमन दलाचे जवानांनी चारपाई सह उचलून बाहेर काढले, घटनेची माहिती सरपंच व पोलीस पाटील यांनी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व पोलीस ठाण्यात दिली.

तहसीलदार यांनी ताबडतोब मंडळ अधिकारी डी पी पाटील, तलाठी गणेश पाटील यांना पंचनामा करण्यास पाठवले, घटनास्थळी गॅस कंपनीचे अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांनी भेट दिली, या आगीत सात ही घरांचे जळून खाक झाली आहे.

तर त्यात साठवून ठेवलेले धान्य, संसारोपयोगी वस्तू सह लक्ष्मीबाईची १३ हजार रुपयांची रोकड असे एकूण पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी गणेश पाटील यांनी केला आहे. मात्र सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही , याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अमोल भालचंद्र पाटील यांच्या खबरी वरून अकस्मात आग रजिस्टरला नोंद करण्यात आली आहे, पुढील तपास हवालदार मुकेश साळुंखे हे करीत आहेत

गजानन पाटील अमळनेर✍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *