अमळनेरातील मंगरूळजवळ डॉक्टरला चाकू लावून चौघांनी लुटले

अमळनेर क्राईम

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील ::> डांगर येथून मोटरसायकलवर अमळनेर येथे येणाऱ्या एका मोटरसायकलस्वार डॉक्टरला चौघांनी चाकू लावून लुटल्याची घटना १९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मंगरूळ गावाजवळ घडली. यावेळी लुटारुंनी वारही केल्याने डॉक्टरच्या हाताला जखम झाली आहे.

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.वृत्त असे की, डांगर येथील डॉ. शिवदास मखराम राठोड हे १९ रोजी रात्री डांगर कडून अमळनेर येथे येत असताना मंगरूळ येथे सेंट मेरी शाळेच्या जवळ दोन मोटरसायकलवर चार अज्ञात तरुण आले व त्यांनी राठोड यांना थांबवत पेट्रोल पंप कुठे आहे ?असे विचारून त्यांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्डयात बळजबरीने नेले. त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायाची बॅग असल्याचे पाहून तरुणांना त्यात भरपूर रक्कम असल्याचा संशय आला.

यावेळी त्या तरुणांनी राठोड याना चाकूचा धाक दाखवला आणि हातावर चाकूचा वार केला. यात त्यांच्या हाताला जखम झाली असून त्यांच्या खिश्यातून बळजबरी ७०० रुपये काढून घेतले व मोटरसायकलीने ते लुटारु पळून गेले.राठोड लगेचच उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये आले.

घटनेचे वृत्त काळताच एपीआय प्रकाश सदगीर व पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी घटनास्थळी रवाना झाले मात्र आरोपींचा तपास लागू शकला नाही. राठोड यांचा दवाखान्यात जबाब घेऊन अमळनेर पोलीस स्टेशनला चार अज्ञात आरोपींविरुद्ध लूटमार व शस्र कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी करत आहेत. काही दिवसांपूर्वी देखील धुळे रोडवर अशाच पद्धतीने रस्त्यावर अडवून बाजूच्या खड्डयात नेऊन एकाला चाकु लावून लुटण्यात आले होते. या लुटारुंचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *