अमळनेरात कोविड सेंटरमध्ये निघाला ६ फुटाचा साप

Social कट्टा अमळनेर कट्टा शेती

अमळनेर ::> शहरातील प्रताप महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहामधील कोविड सेंटरमध्ये रुग्ण दुपारच्या वेळेत मैदानात बसलेले असताना अचानक बाहेरून ६ फुटाचा साप स्टोअर रूममध्ये घुसला.

तेथील प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी नगर परिषदेचे केअर टेकर गणेश शिंगारे यांना या सर्पाबद्दल माहिती सांगितली.

गणेश शिंगारे यांनी लगेच स्टोअर रूममध्ये जाऊन जवळपास ६ फूट लांब व २ इंच जाडीचा सर्प पकडून बाहेर आणला. त्यानंतर रुग्णांच्या जीवात जीव आला. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.