खडसे समर्थकांची राष्ट्रवादी पक्षात प्रवेशासाठी हालचाली सुरू

Politicalकट्टा अमळनेर कट्टा

प्रतिनिधी- अमळनेर ::> अमळनेर तालुक्यातील एकनाथ खडसे यांचे समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल होणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांची माहिती माजी पंचायत समिती सभापती डॉ.दीपक पाटील यांनी नुकतीच दिली.

येथील जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.एस एस ब्रम्हे यांच्या कार्यालयात काही पदाधिकारी जमुन त्यांनी आपले समर्थनार्थ नाव दिले आहे, त्यात माजी पं.स सभापती सुरेखा कामराज पाटील, डॉ.दीपक पाटील, उपसभापती- कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर व संचालक दुध फेडरेशन जळगांव- अ‍ॅड.एस.एस.ब्रम्हे, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर- कामराज व्यंकटराव पाटील, अध्यक्ष नंदाभवानी शिक्षण प्रसारक मंडळ धार व माजी सरपंच धार- गणेश धोंडू पाटील, माजी सरचिटणीस भाजपा- नितीन आधार पाटील, माजी उपसरपंच मौजे हेडावे- लोटन अर्जुन पाटील, माजी सरचिटणीस भाजपा- शत्रुघ्न भावलाल पाटील, माजी सरपंच कन्हेरे- लोटन बारकू पाटील, माजी ग्रा.प.सदस्य रढावण- सुभाष जगन्नाथ पाटील, माजी सरपंच बिलखेडे- भास्कर साहेबराव पाटील, उपसरपंच पळासदळे- राजमल गणेश पाटील, माजी सरपंच धार- यशवंत धोंडू पाटील, आदींचा समावेश आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार नेते एल.टी.पाटील यांनी दिलेल्या यादीत माजी सरपंच एकतास- साहेबराव पाटील, डॉ.भानुदास पुंडलिक पाटील- शहापूर, माजी भाजपा तालुकाध्यक्ष भरतसिंग पाटील- खोकरपाट, सरपंच जितेंद्र पाटील- फाफोरे, गुलाब पाटील- सडावण, प्रभाकर पाटील- एकतास माजी सरपंच, सुरेखा पवार- कंडारी, दहिवदचे माजी जिल्हा परिषद सदस्य ए टी पाटील, माजी पंचायत समिती सभापती अमळनेर- भोजमल पाटील आदींचा समावेश आहे.
वरील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आमदार अनिल पाटील यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादी प्रवेश करणार आहे असे मत व्यक्त केले आहे.
गजानन पाटील,अमळनेर