मंगरूळ गावात विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न!

Politicalकट्टा अमळनेर

प्रतिनिधी अमळनेर ::> तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतीच्या 14 वित्त आयोग निधी अंतर्गत भूमिगट गटारी, रास्ते तसेच गावातील लोकांना स्वस्त शुद्ध पाणी 5 रुपयात 20 लीटर पाणी असलेले जलशुद्धीकरण केंद्र या विविध विकास कामांचा उदघाटन अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


सतत दोन वर्षापासून चांगली पर्जन्यवृष्टी असल्याने गावातील तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असुन त्यांचे सुद्धा जलपूजन आमदारांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी संदीप वायाळ, मंगरूळच्या लोकनियुक्त सरपंच हर्षदा संदीप पाटील यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
गजानन पाटील अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *