आजाराला कंटाळून वृद्धाची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

क्राईम यावल सिटी न्यूज

यावल प्रतिनिधी ::> तालुक्यातील अकलूद येथील एका ७८ वर्षे वृद्ध व्यक्तीने आजाराला कंटाळून तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. प्रल्हाद आनंदा भालेराव असे मृताचे नाव आहे.

प्रल्हाद भालेराव यांना मुखाचा कर्करोग होता. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारामुळे खचले होते. आजारालाच कंटाळून त्यांनी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भुसावळजवळील तापी नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी फैजपूर पोलिसांना माहिती दिली. फैजपूर पोलिस ठाण्याचे हवालदार अनिल महाजन, हेमंत सांगळे यांनी धाव घेत मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणला.

वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *