अहमदाबाद-हावडा आठवड्यातून तीन दिवस

Jalgaon ऑनलाईन-बिनलाइन जळगाव

रिड जळगाव टीम ::> भुसावळ रेल्वे प्रशासनाने अहमदाबाद-हावडा आणि हावडा-मुंबई मेल या विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे या गाड्या आता आठवड्यातून तीन दिवस धावणार आहेत.

हावडा-अहमदाबाद विशेष गाडी हावडा येथून १५ सप्टेंबरपासून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी नियोजित वेळेवर सुटणार आहे.

तसेच अहमदाबाद-हावडा ही विशेष गाडी १८ सप्टेंबरपासून बुधवार, शुक्रवार आणि सोमवारी सुटणार आहे.

तर अप हावडा-मुंबई मेल विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. ही गाडी २१ सप्टेंबरपासून हावडा स्थानकावरून दर सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी सुटणार आहे.

तर डाउन मुंबई-हावडा मेल विशेष गाडी २३ सप्टेंबरपासून दर बुधवारी, शुक्रवारी आणि सोमवारी नियोजित वेळेवर सुटणार आहे.

कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश मिळणार आहे. प्रवाशांनी गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *