साकळीजवळ यावल-चोपडा रस्त्यावर दुचाकी-माल ट्रकचा जोरदार अपघात ; एक ठार एक गंभीर जखमी!

क्राईम यावल

साकळी : >> यावल-चोपडा अंकलेश्वर महामार्गावर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुकाची-मालट्रक मध्ये जोरदार धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात मयत मुकेश सोनार, वय ५५ वर्ष, मेहरूण जळगाव असे तरुणाचे नाव आहे.

साकळी या गावातील मालट्रक ही जळगाव येथे माल आणण्यास जात असताना चुंचाळे फाट्या नजदीक ट्रक व दुचाकीमध्ये जोरदार धडक झाल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली. मयत व्यक्तीचे नाव मुकेश सोनार, वय ५५ वर्ष मेहरूण जळगाव असे आहे. तर जखमी व्यक्तीचे नाव रुपेश सोनार, वय ३५ असे दोघेही मेहरूण जळगाव येथील आहेत.

दुचाकी क्रमांक, MH19CQ2989जळगावहून यावलकडे येत होती. तर माल वाहतूक ट्रक क्रमांक, 407 MH194100 दुचाकीचा अपघात झाला आहे. यामध्ये मुकेश सोनार हे जागीच ठार झाले असून रुपेश सोनार हे जखमी झाले आहेत. तसेच जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.अशी माहिती साकळीतील नागरिकांनी रिड जळगाव ला दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावरील वळणावर कृजर गाडीचा अपघात झाला होता. यामध्ये सहा जण जखमी झाले होते. तर गाडीचे खूप मोठे नुकसान झाले होते. सदरील रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी सावधान राहण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *