चुंचाळे प्रतिनिधी ::> चोपडा रस्त्यावरील चुंचाळे फाट्याजवळ दुचाकी अपघातात यावल येथील विरार नगरातील रहिवासी पिता-पुत्र जखमी झाले. खराब रस्त्यावर शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. फैजपूर रस्त्यालगतच्या विरार नगरातील रवींद्र तुळशिराम बडगुजर (वय ५८) आणि त्यांचा मुलगा कृष्णा रवींद्र बडगुजर (वय २०) हे दोघे शुक्रवारी रात्री जळगाव येथून दुचाकीने यावलकडे येत होते. चोपडा रस्त्यावर चुंचाळे फाट्याजवळ रस्त्यावरील खड्डे चुकवताना त्यांची दुचाकी घसरली. त्यात रवींद्र बडगुजर यांना डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांच्या मुलास देखील इजा झाली. दोघांवर यावल ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले.