किनगाव ::> यावल-चोपडा रस्त्यावर किनगाव जवळ आयशरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. चोपडा येथून भुसावळकड जात असलेल्या आयशर (क्रमांक जीजे २७-व्ही ५८३८ ) वाहनाने यावलहून चोपड्याच्या दिशेने जाणार्या ( क्रमांक एमएच ३० एजे-१८८४ ) दुचाकीला जोरदार धडक दिली. यावर असणारे स्त्री-पुरूष हे जागीच ठार झाले.
संबंधीतांजवळ असणार्या कागदपत्रांवरून हे दोन्ही जण पती-पत्नी असल्याची माहिती मिळाली असून ते बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील असल्याचे समजते. हा अपघात सकाळी अकराच्या सुमारास घडला.
तसेच ,अपघाताची माहिती मिळतच परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. मृतदेह यावल येथील रूग्णालयात नेण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.