आगामी शैक्षणिक वर्षाची ‘शैक्षणिक शुल्कवाढ’ रद्द करण्यात यावी – अभाविप

Jalgaon जळगाव

जळगाव प्रतिनिधी : > कोरोना महामारीने संपूर्ण जगभरामध्ये थैमान घातले आहे, या महामारी मुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व क्षेत्रातील व्यवहार बंद आहेत. यामध्ये अनेक समस्यांना विद्यार्थी, पालक सामोरे जात असताना त्यांना त्यांच्या मुलांच्या भवितव्याची चिंता मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. नविन शैक्षणिक वर्ष २०२० – २०२१ चे प्रवेश प्रक्रिया तसेच शैक्षणिक शुल्क एवढे मोठ्या प्रमाणात कसे भरावे. याचा विचार विद्यार्थी व पालक करत आहेत, त्यात आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक शुल्क वाढीचा निर्णय जानेवारी महिन्यात घेतला आहे.

कुलगुरू महोदयांनी कोरोना महामारीचे संकट व त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेता आगामी शैक्षणिक वर्षी होणारी शैक्षणिक शुल्क वाढ रद्द करून विद्यार्थी व पालक यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कुलगुरूंना ईमेल द्वारे आज करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *