शिंदखेडा तालुक्यातील पिंप्राड शिवारात ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू

अपघात क्राईम धुळे माझं खान्देश शिंदखेडा

धुळे ::> शिंदखेडा तालुक्यातील पिंप्राड शिवारात भरधाव वेगातील ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्यामुळे तरुण ठार तर एक जण जखमी झाला. दीपक शेलार असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरून ट्रक (एमपी-०९-एचएच ०९९६) सुसाट वेगात निघाला होता. या ट्रकने मोटारसायकलला ( एमएच-१८-बीजे-५८८४) धडक दिली. त्यात एक तरुण ठार झाला तर अन्य एक जण जखमी झाला. दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

चौकशीअंती मृत तरुणाचे नाव दीपक समाधान शेलार ( वय २०, रा.धुळे ) असे असल्याचे समोर आले आहे. दीपक हा शहरातील सामाजिक कार्यकर्ते समाधान शेलार यांचा लहान मुलगा होता.

सायंकाळी शवविच्छेदन केल्यानंतर रात्री शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.