पिसाळलेल्या कुत्र्याने किनगावात तोडले पाच जणांचे लचके

किनगाव क्राईम यावल

किनगाव प्रतिनिधी ::> यावल तालुक्यातील किनगाव बुद्रूक येथे पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणांना चावा घेतल्याची घटना सोमवारी रात्री घडली. त्यापैकी तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून जळगावला हलवण्यात आले. पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी संतप्त नागरीकांनी केली. जखमींपैकी कैलास बारेला (वय ३४, रा.गिरडगाव), सुनंदा साळुंके (वय ५०, रा. किनगाव) व प्रदीप बारेला (वय २६, रा. किनगाव) यांना गंभीर दुखापत झाली आहे.