पारोळ्यात २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

आत्महत्या क्राईम पारोळा सिटी न्यूज

पारोळा >> शहरातील बागवान गल्लीतील रहिवासी २२ वर्षीय तरुणाने मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मोहसीन खान अब्दुल करीम खाने असे मृताचे नाव आहे. त्याने दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरी दोरीने गळफास घेतला. याबाबत इम्रान खान अब्दुल करीम खान यांच्या खबरीवरून पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास किशोर पाटील करत आहे.