जळगाव >> मद्य प्राशन करून ३१ डिसेंबरला गाडी चालवणाऱ्या २४ व्यक्तींवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्यांची शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणी करण्यात आली.

डॉक्टरांनी तपासणी करून मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून समज दिली. ७०पेक्षा अधिक नियम मोडणाऱ्या तर मद्य प्राशन करून गाडी चालवणाऱ्या २४ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून त्यांना समज देण्यात आली.

या व्यक्तींना तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले होते. पोलिसांच्या पथकाने पहाटे चारपर्यंत ही कारवाई झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *