31 हजारांचे विदेशी मद्य पकडले; तिघांना अटक

क्राईम जळगाव

जळगाव – रामानंदनगर पोलिसांना गस्त घालत असतांना एका रिक्षावर संशय आला. चालकासह मागे दोन जण बसले होते. तपासणीसाठी रिक्षा थांबविणार तोच चालकाने पोलिसांना पाहताच भरधाव वेगाने वेगवेगळ्या गल्ल्यांमधून रिक्षा पळविली.

पोलिसांनी पाठलाग करुन रिक्षा पकडली. तपासणी केली असता रिक्षात इम्पिरिअल ब्लु ब्रॅन्डच्या लहान मोठ्या अशा विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. सागरपार्क परिसरात पोलिसांनी शनिवारी दुपारी 12.30 वाजता ही कारवाई केली.

रिक्षाचालकाकडे मद्य वाहतुकीसह मद्य पिण्याचा असा कुठलाही परवाना नसल्याने कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलिसांनी 31 हजार 320 रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या असून रिक्षाचालकासह तिघांना ताब्यात घेतले आहे.

रामानंदनगर पोलीस ठाण्याचे स. पो. नि. सुहास राऊत, सहाय्यक फौजदार गोपाळ चौधरी, विलास पवार, जयंत कुमावत, नितीन अत्तरदे, निलेश दंडगव्हाळ हे रामानंदनगर रोडवर गस्त घालत होते.

या ठिकाणाहून जात असलेल्या एम.एच.19 व्ही.3476 या क्रमाकांच्या रिक्षावर त्यांना संशय आला होता. सागरपार्क परिसरात पाठलाग करुन पथकाने ही रिक्षा पकडली.
पोलिसांच्या चाअकशीत शेख निजामुद्दीन शेख खुशूबुद्दीन (वय 33 रा. तांबापुरा ) असे रिक्षाचालकाचे नाव समोर आले.

पोलिसांनी रिक्षा रामानंदनगर पोलीस ठाण्यात आणली. रिक्षासह 31 हजार 320 रुपयांच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आला. रिक्षाचालकासह राकेश धनराज हटकर (वय 21), रविंद्र राजू हटकर (वय 30, दोघे रा. तांबापुरा यांनाही ताब्यात घेण्यात आले विलास पवार यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *