२८ वर्षीय तरुणाचा तापी नदीत बुडाल्याने मृत्यू

Jalgaon आत्महत्या क्राईम जळगाव जळगाव जिल्हा तापी

जळगाव >> तालुक्यातील किनोद गावाजवळ तापी नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. १६ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता तरुणाचा मृतदेह आढळून आला. गोपाल दंगल भील (वय २८, रा. किनोद, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. भिल हे १५ मार्च रोजी रात्रीपासून बेपत्ता होते. १६ रोजी सकाळी तापी नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. विलास शिंदे तपास करीत आहेत.