२८ वर्षीय तरुणाची राहत्या घरात आत्महत्या!

Jalgaon Jalgaon MIDC आत्महत्या जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> जळगावातील योगेश्वर नगरातील २८ वर्षीय तरूणाने राहत्या घरात पत्नी झोपलेली असतांना छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज पहाटे ५ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पराग गोकुळ खडके (वय-२८) रा. योगेश्वर नगर हा आपल्या आई भाऊ व पत्नीसह राहतात. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून एमआयडीसीतील छबी ईलेक्ट्रिक कंपनीत कामाला आहे.

२७ मार्च रोजी रात्री मित्रांसोबत गप्पा मारून घरी गेला. त्यानंतर रात्री जेवन करून झोपले. मध्यरात्री पराग खडके याने छताला दोरीच्या सहाय्याने पत्नी झोपलेली असताना गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार आज २८ मार्च रोजी पहाटे ५ वाजता परागची आई शोभाबाई ह्या पाणी भरण्यासाठी उठले. त्यावेळी त्यांनी खिडकीतून मुलगा परागने गाळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी हंबरडा फोडला.

आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. परागचाच चार वर्षांपुर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांच्यापश्चात पत्नी तारा, तीन वर्षाची मुलगी युक्ता, आई शोभाबाई, भाऊ विक्की असा परिवार आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. अहिरे यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.