जळगाव शहरात एका २६ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन ट्रकचालकाने हैदराबाद येथे पळवून नेल्याचा प्रकार समोर आला. मोहंमद आरिफ मोहंमद अमानउल्लाह (रा. नंदानगर, तुकाराम गेट, उत्तरलाला गुडा, सिकंदराबाद, तेलंगणा) याने १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी तरुणीस तिच्या राहत्या घरात शीतपेयात गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर तिला कारमध्ये बसवून थेट हैदराबाद येथे लग्न लावण्यासाठी घेऊन गेला. त्याठिकाणी तरुणीला दोन दिवस तिच्या इच्छेविरुद्ध घरात डांबून ठेवले. तसेच तिच्या नातेवाइकांकडे बदनामी केली. या तरुणीने स्वत: त्याच्यापासून सुटका करून घेत जळगाव गाठले. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून मोहंमद विरुद्ध एमआयडीसी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख करीत तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *