यावल >> तालुक्यातील दहिगाव येथील 22 वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

सुजाता संतोष पाटील असे मृत तरुणीचे नाव आहे.तिने आत्महत्या का केली हे कारण मात्र समोर आले नाही.

दहिगाव येथील सुरेश आबा नगर रस्त्यावरील रहिवासी सुजाता संतोष पाटील या तरुणीने सकाळी काहीतरी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली.

हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र तपासणीअंती रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

याप्रकरणी काशिनाथ एकनाथ पाटील यांनी दिलेल्या खबरी वरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करत आहे. सुजाता ने आत्महत्या का केली? याचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *