जिल्ह्यात २१ एप्रिलपर्यंत ३७ (३) कलम जारी, जमावबंदी आदेश लागू

Featured Jalgaon कोरोना जळगाव जळगाव जिल्हा रिड जळगाव टीम लॉकडाऊन सिटी न्यूज

जळगाव >> कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरु असून संसर्गावर नियंत्रण सुरू आहे. तरी देखील जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे निर्गमित केलेले आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात २१ एप्रिल, २०२१ पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे.

या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.