रावेर-वाघोदा परिसरात बनावट दोनशेच्या नोटा आढळल्या

रावेर सावदा

मोठा वाघोदा >> रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा, चिनावल, कोचूर, खिरोदा परिसरात शंभर व दोनशेच्या बनावटी नोटा चलनात आल्या आहेत. बाजारात गर्दीच्या ठिकाणी किंवा ग्राहकांची वर्दळ असलेल्या दुकानांवर या नोटा चालवण्यात आल्या आहेत, अशी माहिती संबंधित दुकानदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

हुबेहूब दिसणाऱ्या या नोटा गेल्या आठवडाभरात व्यवहारात आल्या आहेत. या बनावटी नकली नोटा चालवणाऱ्यांचे रॅकेट तालुक्यात व परिसरात कार्यरत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि दुकानदारांना नुकसान सहन करावे लागत आहे. पोलिस प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन, या रॅकेटचा भांडाफोड करावा, तसेच या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.