१६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

क्राईम धुळे माझं खान्देश शिंदखेडा

धुळे >> शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथून अल्पवयीन मुली बेपत्ता झाली. अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून अपहरण केल्याची तक्रार पालकांनी दिली आहे. त्यावरून नरडाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील १६ वर्षीय मुलगी मैत्रिणीकडे जाते असे सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर ती परत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी नातलग व तिच्या मैत्रिणींकडे तिचा शोध घेतला. पण ती सापडली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे. त्यावरून सोमवारी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी नरडाणा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.