१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

क्राईम धुळे माझं खान्देश

धुळे >> पिंपळनेर परिसरातील सामोडे येथे रोजगारासाठी आलेल्या कुटुंबातील १४ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती आढळली नाही. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर येथील रहिवासी आहे. या प्रकरणी सोमवारी रात्री आठ वाजता पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.