पत्रकार दिनी पार पडला चाळीसगाव तालुक्यातील पत्रकारांचा सपत्नीक सत्कार सोहळा…

 

चाळीसगाव  : पत्रकारिता करतांना पत्रकारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते, डिजिटल मिडियामुळे आज पत्रकारितेच्या व्याख्या बदलल्या असल्या तरी पत्रकारांच्या ज्या समस्या पूर्वी होत्या त्याच आज देखील कायम आहेत. चाळीसगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवाना त्यांच्या हक्काचे पत्रकार भवन मिळावे तसेच जेष्ठ पत्रकार यांनी केलेल्या सूचना व त्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आगामी काळात सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून स्वतःचे घर नसलेल्या पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी नवीन म्हाडा योजनेत अल्पदरात प्राधान्याने घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल अशी घोषणा चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली, ते शिवनेरी फाउंडेशन तर्फे पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित चाळीसगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या सपत्नीक सत्कार सोहळ्यात बोलत होते.

चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात आयोजित या सत्कार सोहळ्याला पत्रकार बांधवांना संसारात खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती यांना व्यासपीठावर स्थान देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण व सौ.प्रतिभा चव्हाण यांच्या हस्ते चाळीसगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सपत्नीक सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष आर डी चौधरी, सचिव एम बी पाटील, रमेश जानराव, जिजाबराव वाघ, आनंद खरात, अजय कोतकर, देविदास पाटील, संजय सोनार, सोनार काका, मोतीलाल अहिरे, मनोहर कांडेकर, मुराद पटेल, रामलाल चौधरी, प्रशांत गायकवाड, सूर्यकांत कदम, गणेश पवार, निलेश परदेशी, राजेंद्र डी.चौधरी, खुशाल बिडे, आकाश धुमाळ, रणधीर जाधव, संदीप पाटील, सुनील राजपूत, विजय सपकाळे, सोमनाथ माळी, विशाल कारडा,निलेश परदेशी, तारकेश्वर परदेशी, अजीज खाटिक, महेंद्र सूर्यवंशी, जीवन चव्हाण, यश पालवे, यांच्यासह चाळीसगाव शहर व तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *