साई मंदिराबाबत सोशल मीडियावर अफवा, मंदिर प्रशासनाने केला खुलासा

राज्यात मागील काही दिवसांत करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मंदिरांबाबत अद्याप नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही. असं असताना शिर्डीच्या साई मंदिराबाबत सोशल मीडियात अफवा पसरल्याने मंदिर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे. (Sai Baba Mandir Guideline)
शिर्डीतील साई मंदिर सध्या आहे त्याच पद्धतीने सुरू राहणार असून नवे नियम लागू केल्याच्या सोशल मीडियातील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन साईबाबा संस्थान मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

साईबाबांचे मंदिर शनिवार व रविवार रोजी बंद राहणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र मंदिराबाबतचे अद्यापपर्यंत कुठलेही आदेश शासन स्तरावरून निर्गमित झालेले नाहीत. त्यामुळे अशा अफवांवर भाविकांनी विश्वास ठेवू नये, असं मंदिर प्रशासनाने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *