वरणगाव ग्रामीण रुग्णालयात 400 परप्रांतीयांनी केली आरोग्य तपासणी

भुसावळ वरणगाव

वरणगाव : परराज्यात जाण्यासाठी शासनाच्या वतीने परवानगी देण्यात आल्याने त्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांचे फिटनेस सर्टिफिकेट गरजेचे असल्याने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांमध्ये 400 पेक्षा जास्त परप्रांतीयांनी फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी संबंधिताची आरोग्य प्रशासनाकडून आरोग्य तपासणीदेखील करण्यात आली.

अडकलेल्या मजुरांना गावी जाण्याची मुभा
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरती देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते परंतु शासनाने आता जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना आपल्या गावी परतण्यासाठी परवानगी दिलेली आहे.

यासाठी तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून पास मिळवावा लागत असून जवळच्या रुग्णालयात जाऊन स्वतःची तपासणी करून फिटनेस सर्टिफिकेट अर्जासोबत जोडावे लागत आहे. या तपासणीमध्ये फिटनेस असेल तरच बाहेरगावी जाण्यासाठी परवानगी दिली जात आहे.

दीपनगर औष्णिक केंद्रातील व महामार्गावरील मजूर
शहराजवळ असलेल्या दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र व महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत शेकडो मजूर काम करत आहे. लॉकडाऊनमुळे ते अडकून पडले होते शिवाय कामदेखील नसल्याने या मजुरांना घरी जायचे असून यासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयमध्ये मंगळवार पासूनच परप्रांतीयांची फिटनेस सर्टिफिकेटसाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे.

अशी केली जाते तपासणी

फिटनेस सर्टिफिकेटसाठी आलेल्या प्रवासाच्या थर्मल स्क्रीनिंग केले जाते तसेच त्याची हिस्ट्री व लक्षणांची तपासणी केल्यानंतर आलेल्या प्रवाशाला ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते. ग्रामीण रुग्णालयाच्या पोर्च मध्येच वैद्यकीय अधिकार्‍यांनी टेबल लावून याठिकाणी तपासणी केली जात होती या प्रवाशांसाठी पाणी अथवा मुतारीची व्यवस्था नसल्याने भर उन्हाळ्यात त्यांचे हाल होत आहे यासाठी किमान पाण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *