चाळीसगाव : एन.एस.एस.विभाग, बी. पी.आर्टस् , एस. एम. ए. सायन्स, के.के.सी.कॉमर्स महाविद्यालय, के. आर. कोतकर कनिष्ठ महाविद्यालय आणि तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव वकील संघ यांच्या संयुक्तमाने राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिवसानिमित्ताने अँड. माधुरी बी. एडके याचे राष्ट्रीय मानवी तस्करी जागरुकता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

ऑनलाइन व्याख्यानाची प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिलदीकर मांडली यांनी मानवी तस्करी म्हणजे काय..? तस्करी रोकन्यासाठी आपण काय प्रयत्न करावे असे आव्हान केले, प्रमुख वक्त्या अँड. माधुरी. बी. एडके, यांनी मानवी तस्करीमध्ये तस्कराचे मुख्य लक्ष्य लहान मुले, अल्पवयीन मुली व स्त्रिया हे असून त्याचे शोषण कसे होते, तस्करी रोकन्यासाठी आयपीसी मधील तरतुदी, व्हीक्टिम च्या सुरक्षेसाठी विविध कायद्याची माहिती व शिक्षेची तरतूद व सुजाण नागरिक म्हणून आपण सुध्या मानवी तस्करी रोकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, नंतर श्री एन के वाळके यांनी पिडीतचे संरक्षण कसे करावे, मानवी तस्करी ही एक जागतिक समस्या असून मानवतेला काळिमा फासणारी गोष्ट आहे , तसेच त्या संदर्भात विविध कायद्याची माहिती देऊन मानवी तस्करी संदर्भात तक्रार करण्यासाठी टोल फ्री नं 1098 आणि 1091 संपर्क करू शकता असे आव्हान केले आहे.

कार्यकर्माचे सूत्रसंचालन प्रा. जी. पी. सदावर्ते यांनी तर आभार अँड. संदीप सोनार यांनी केले. सदर कार्यक्रम डॉ. एन.पी.पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.आर.बोरसे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.एस.पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपक पाटील सहा.कार्यक्रम अधिकारी तसेच विधी सेवा समितीचे कर्मचारी डी. के. पवार, डी, टी. कुराडे, किशोर पाटील यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *