चाळीसगाव ; कन्येच्या वाढदिवसाचे निमित्त साधून चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवालयांचा उपक्रम साजरा केला आहे.

 

कन्या काजलच्या  वाढदिवसाचे निमित्त साधून चाळीसगाव तालुक्यातील अनेक दिव्यांगांना त्यांना उपयुक्त अशा साहित्याचे वाटप केले तर विधवा परितक्त्या यांना शिलाई मशीन देऊन त्यांना रोजगारासाठी हातभार लावला अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करून धाडीवाल यांनी समाजामध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी एक आदर्श घालून दिला आहे असे उद्गार यावेळी स्वयंदीप संस्थेच्या मीनाक्षीताई निकम यांनी काढले तर ज्या दिव्यांगांना साहित्य मिळाले त्यांनी व विधवा परितक्त्या यांनी  यांना वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्यात यावेळी काजल धाडीवाल यांच्या सासरची मंडळी व वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परिवारातील सर्व सदस्य सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *