मुक्ताईनगरात सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला वाढदिवस

Social कट्टा कट्टा मुक्ताईनगर

मुक्ताईनगर (प्रतिनिधी कैलास कोळी): शिक्षक हे समाजाचे आणि देशाचे मार्गदर्शक असतात. देशाचे भविष्य घड्वण्यचि ताकद ही शिक्षकातच असते. अशाच एका शिक्षिकेने सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला आपला वाढदिवस. संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर येथील रा. स. यो. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका डॉ. पंचशीला वाघमारे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला.

लॉकडाऊनच्या काळात सर्व गोर गरीब जनतेचे हाल होत असताना समाजकार्याचा वसा घेतलेल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर येथे गोर गरीब जनतेला तसेच मजुरांना अन्नदानाचे काम करीत आहेत. सुमित बोदडे,विशाल सापधरे, शुभम तलेले, राहुल शूरपाटने व योगेश कपले यासारख्या सामाजीक कार्यकर्त्यासोबत डॉ. पंचशीला वाघमारे यांनी सहकुटुंब शासकीय रुग्णालयातील गरजू पेशेंट्सना तसेच मजुरांना अन्नदान वाटप करण्याचे काम केले.

आपल्याप्रमाणेच आपल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी व इतरांबद्दल आपुलकी दया व माणुसकी जपण्याचा संदेश या कार्यातून दिला. या कार्यात त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आई. डी. पाटील, समस्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शुभेच्छा लाभल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *