जळगाव (हर्षल सोनार) : दि पूर्व खान्देश हिन्दी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माँसाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवक दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील तर व्यासपीठावर पर्यवेक्षक डी. बी. सोनवणे व कनिष्ठ विभाग प्रमुख गजेंद्र पाटील उपस्थित होते. माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले त्यावेळी महाविद्यालयाचे उपशिक्षक मुकुंद वाणी यांनी त्या महान विभूती यांच्या जीवनातील प्रसंग सांगून त्यांचे गुण अंगी करण्याचे आव्हान केले तसेच स्वामी विवेकानंद यांनी मांडलेल्या तत्वज्ञानाचा लेखाजोखा त्यांनी आपल्या वक्तव्यातून व्यक्त केला महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली व त्यांच्या गुणवैशिष्ट्ये यांची महानता सांगून ते अंगी करण्याचे आव्हान आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचा शेवट संजय चौधरी यांनी आभार व्यक्त केले सर्व कार्यक्रम कोविड नियमांचं पालन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *