भुसावळातील मध्य रेल्वेचे हॉस्पिटल ‘कोविड हॉस्पिटल’ म्हणून घोषित…

भुसावळ सिटी न्यूज

भुसावळ : जळगाव जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग व कोव्हिड -१९ विषाणूमुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या उपचाराकरीता आपत्तकालीन व्यवस्था म्हणून “सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, भुसावळ” हे हॉस्पिटल अत्यावश्यक बाब म्हणून म्हणून घोषित करण्यात आले आहे. सेन्ट्रल रेल्वे हॉस्पिटल, भुसावळ यांनी सदर हॉस्पिटल मधील ८ आयसीयू बेडसहीत एकूण ६४ बेड राखीव ठेवावेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *